ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचं निधन

मुंबई ;  पत्रकारितेतला धडधडता आवाज तसेच संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचे सक्रिय साक्षीदार ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचं आज मुबंईत दादर इथल्या त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते 95 वर्षांच्या होते. आज सकाळी राहत्या घरी वृद्धपकाळाने त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

महाराष्ट्राचे धडाडीचे पत्रकार आणि  संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात  दिनू रणदिवे यांचा सहभाग होता. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्र एका मोठ्या इतिहासाच्या साक्षिदाराला मुकला आहे. संयुक्त महाराष्ट्र लढ्यात लालबाग-परळ, आणि हुतात्मा स्माराकात झालेल्या हिंसक आंदोलनाचे दिनू रणदिवे हे साक्षीदार होते.

दिनू रणदिवे यांचा जन्म   पालघर जिल्ह्यातील डहाणु तालुक्यात आदिवासी गावात 1925 साली झाला. 1955 साली सुरू झालेल्या गोवा मुक्ती संग्रामातही ते सहभागी झाले होते.