अखेर शिवसेना शाखेत विवाह संपन्न झाला…..!

मुंबई : “परिस्थिती गंभीर तिथे शिवसेना खंबीर” हे ब्रीदवाक्य घेऊन हिंदुहृदयसम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आजही जनतेच्या हिताचे काम करत आहे. मुंबई किंवा महाराष्ट्रवर येणाऱ्या प्रत्येक संकटात शिवसेनेचे शिवसैनिक मदतीसाठी धाऊन येतात. आज कोरोनाच्या संकटात सुद्धा शिवसैनिकांचा मदतीचा ओघ सुरूच आहे. आज संसर्गाच्या संकटात रक्ताचा तुटवडा जाणवू नये म्हणून जागोजागी रक्तदान शिबिराचे आयोजन शिवसैनिकांतर्फे करण्यात येत आहे.  अशीच सामाजिक भावना ठेऊन शिवसेना आणि शिवसैनिक काम करत आहे.       

याच भावनेतून प्रभागातील गरीब कुटुंबातील गृहस्थ श्रावण कांबळे यांची मुलगी स्नेहा कांबळे हीचा विवाह उल्हासनगर येथे राहणाऱ्या कांबळे कुटुबांशी तीन महिन्याआधी विवाह ठरला होता. परंतु ह्या दरम्यान करोना महामारीने लाॅकडावून झाले, त्यामुळे वडिल मोठ्या चिंतेत होते विवाहासाठी कुठेही जागा, हाॅल, उपलब्ध होत नव्हते, तसेच अनेक अटी, शर्थी लादण्यात आल्या होत्या. त्याबरोबरच हॉलचे भाडे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी शाखाप्रमुख प्रमोद परब यांच्या शी संपर्क साधून शाखेसमोरील मैदान रविवार दि.१४ जून २०२० रोजी  देण्याची विनंती केली. त्यांना संमतीही मिळाली. परंतु दुष्काळात तेरावा महिना म्हणावा तसा दोन दिवस झालेल्या पावसामुळे मैदानात संपूर्ण पाणी साचले होते.

परंतु, तारीख व वेळ ठरल्यामुळे शाखा प्रमुखांनी नगरसेवक रमेश जाधव यांच्याशी संपर्क साधून विवाह शाखेत लावण्याचा निर्णय घेण्यात आला, वधू व वरा कडील १५ वऱ्हाडी मंडळी व शिवसैनिक नंदकुमार भोसले, गणेश पालव, राणे मामा, प्रमोद परब बिल्डर यांच्या उपस्थितीत विवाह पार पडला. सामाजिक भावना जपत कांबळे व जाधव कुटुंबीयांनी रमेश जाधव नगरसेवक, माजी महापौर व शिवसैनिकांन प्रती कृतज्ञता व्यक्त केली व आभार मानले.

Loading