लडाखमध्ये भारत आणि चीन आमने-सामने,कर्नलसह दोन जवान शहीद

लडाख ; भारत आणि चीनमध्ये सध्या तणाव असून चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरु असतानाच दोन्ही देशांच्या सैन्य समोरासमोर आल्याची माहिती मिळाली. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, लडाखमधील गॅल्वान खोऱ्यात सोमवारी रात्री दोन्ही देशाचे सैन्य एकमेकांसमोर आले होते. यावेळी झालेल्या हिंसाचारात भारतीय कर्नल सह दोन जवान शहीद झाले आहेत. दोन्ही बाजूचे वरिष्ठ अधिकारी सध्या भेट घेऊन यावर चर्चा करणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून चीनचे सैनिक भारतीय हद्दीत अतिक्रमण करत होते. त्यानंतर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमकही झाली. त्यानंतर तणाव निर्माण झाल्याने तो दूर करण्यासाठी पडद्यामागून बऱ्याच हालचाली झाल्या होत्या. मात्र आज चिनी सैन्यानं पुन्हा भारतीय सैन्यावर हल्ला केला. काही वर्षांपूर्वी डोकलामचं प्रकरण घडल्यानंतर अनेक दिवस तणाव होता. त्यानंतर चीनने माघार घेतली होती. मात्र आता पुन्हा चीनचं अतिक्रमण सुरू आहे.

याआधी पूर्व लद्दाखच्या गलवान घाटी, पीपी-15 आणि हॉट स्प्रिंग्स या भागातून चिनी सैन्य मागे हटवण्यात आलं होतं. प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ चीनच्या भागात मोल्डो जवळ भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये ही चर्चा झाली होती.

Loading