BREAKING: बुलडाण्यात ‘कोरोना’ संशयित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू

कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. राज्यातही कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. तर बुलडाण्यामध्ये कोरोना व्हायरसच्या संशयित 70 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

बुलडाण्यामध्ये विदेशातून आलेल्या एका 70 वर्षीय रुग्णावर सामान्य रुग्णालय येथील कक्षात उपचार सुरू असताना या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सकाळपासून या रुग्णावर उपचार सुरू असून कोरोना संशयित रुग्ण म्हणून त्याच्यावर उपचार केले जात होते. या रुग्णाचे  नमुने तपासणीसाठी नागपूरला  पाठवण्यात आले होते. परंतु, आज सायंकाळी साडेचार वाजेच्यादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला. मात्र, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून या रुग्णाला मधुमेह, हृदयरोग यासारखे आजार जडले असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

चिखली येथील ७० वर्षीय व्यक्ती सौदी अरेबिया इथं 25 फेब्रुवारी रोजी गेला असता तो 13 मार्च रोजी परत आला होता.  बुलडाण्यात परत आल्यानंतर त्याला ताप, सर्दी खोकला असल्याने तो बुलडाणा येथील खाजगी रुग्णालयात गेला. मात्र, तेथून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आलं होतं. त्याचे लक्षणे पाहता त्याला सामान्य रुग्णालयातील आय सोल्युशन वार्डमध्ये भरती करण्यात आले  होते. आज सकाळपासून त्याच्यावर कोरोनाचा संशयित रुग्ण म्हणून उपचार सुरू होते. सोबतच त्याला इतरही आजार जडले होते. त्याचे नमुने हे नागपूर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. परंतु, उपचार सुरू असताना या रुग्णाचा मृत्यू झाला. दोन दिवसांत या रुग्णाचा रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होईल. मात्र, त्याच्यावर कोरोना संशयित रुग्ण म्हणूनच उपचार सुरू होते, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. प्रेमचंद पंडित यांनी दिली

Loading