creditcard

मी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अजिबात तडजोड करणार नाही – हुमा कुरेशी

axis

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मी अजिबात तडजोड करु शकत नाही असे अभिनेत्री हुमा कुरेशीने म्हटले आहे. हुमा कुरेशी इटीच्या एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. त्यावेळी तिथे तिला अनेक कलाकार मत व्यक्त करण्यापासून कचरतात. पण तू ठामपणे तुझी भूमिका मांडत असतेस असा प्रश्न विचारला.

No posts found.

त्यावर हुमाने “लोकशाही देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले पाहिजे. त्यावर तडजोड होऊ शकत नाही. आज मी जे काही आहे ते, माझे आई-वडिल आणि पालकांमुळे आहे असे तिने सांगितले. देशात काही तरी घडतेय आणि ते योग्य नसेल तर मी शांत बसू शकत नाही, मी आवाज उठवणार” असे हुमा म्हणाली.

‘मी आंदो’लक नाही, सर्वात आधी मी एक कलाकार आहे. पण एक सेलिब्रिटी म्हणून जे आपण आपले मत मांडले पाहिजे’ असे मला वाटते असे हुमा म्हणाली. हुमा कुरेशी एका संवेदनशील अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. रंगभूमीपासून सुरुवात करणाऱ्या हुमा कुरेशीने करीयरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मॉडेलिंगही केले आहे. एका जाहीरातीमध्ये अनुराग कश्यपने तिला पाहिले. तिचा लूक आणि अभिनयाची क्षमता ओळखून अनुराग कश्यपने तिला तीन चित्रपटांसाठी करारबद्ध केले.

२०१२ साली ‘गॅग्स ऑफ वासेपूर’ सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अनेक समीक्षकांनी तिच्या कामाचे कौतुक केले होते. फिल्मफेअरच्या बेस्ट फिमेल डेब्युचे तिला नामांकनही मिळाले होते. त्यानंतर तिने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली.