पुणे: परदेशात न जाताही 5 जण कोरोना पॉझिटिव्ह

‘पुण्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 15 वर पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासात पाच नवीन रुग्ण ऍडमिट करण्यात आले आहेत. काल पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले, त्याबद्दल आम्हाला चिंता आहे. कारण ते कुठेही परदेशात गेले नव्हते. पण त्यांचा एक नातेवाईक कोरोना पॉझिटिव्ह होता. त्याच्या संपर्कात आल्यामुळे हे पाच जणही कोरोना बाधित झाले,’ अशी माहिती पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

‘पुण्यात 57 जण ऍडमिट आहेत. NiV 315 सॅम्पल पाठवले होते. त्यातील 294 रिपोर्ट प्राप्त झाले. यातील 15 जण वगळता बाकी निगेटिव्ह आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत पुण्यात 15 कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काल आम्ही मॉलही बंद केले आहेत. फक्त त्यातील मेडिकल्स जीवनावश्यक वस्तूंचे स्टोअर्स सुरू राहतील. त्यामुळे लोकांनी घरं सोडू नयेत, ही कळकळीची विनंती, शासन आदेशाचं पालन करावं,’असं आवाहन दीपक म्हैसेकर यांनी केलं आहे.

दरम्यान, औरंगाबादमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. औरंगाबादमधील 59 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं निदान झालं आहे. ही महिला रशिया आणि कझाकिस्तानमधून प्रवास करून पुन्हा भारतात आली होती. या महिलेला अस्वस्थ वाटू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. धूत रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरू आहेत. या महिलेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची (covid-19) संख्या वाढली आहे. आता देशात सर्वाधिक coronavirus चे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मुंबई, नवी मुंबई आणि यवतमाळमध्येसोबतच आता औरंगाबादमध्येही रुग्ण सापडल्याने राज्यातल्या बाधितांची संख्या वाढली आहे.  महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 32 वर पोहोचली आहे.

कोरोना संदर्भात खबरदारीचा पर्याय म्हणून सगळ्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यात राज्यातल्या सरकारी आणि खासगी सर्व शाळांचा समावेश आहे. येत्या 31 मार्चपर्यंत राज्यातील सर्व शाळा बंद राहतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत सांगितलं.

कुठल्या शहरात किती रुग्ण ?

नागपूर – 4

यवतमाळ – 2

ठाणे – 1

अहमदनगर – 1

कल्याण 1

पनवेल – 1

नवी मुंबई – 1

मुंबई – 5

औरंगाबाद – 1

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News