creditcard

शेअर बाजार कोसळला सकाळी १६०० अंकांची घसरण

axis

कोरोना आणि आंतरराष्ट्रीय बाजारातली घसरण यामुळे शेअर बाजारही गडगडला. सेन्सेक्स 2300 पेक्षा जास्त अंकांनी तर निफ्टी 700पेक्षा जास्त अंकांनी कोसळला. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाला महारोगराई जाहीर केल्यानंतर जगभरातल्या गुंतवणूकदारांमध्ये गोंधळाचं वातावरण पसरल आहे.

No posts found.

त्यातच भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने त्याचे पडसाद शेअर बाजारात उमटले. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढच्या महिन्याभरासाठी युरोपमधून अमेरिकेत प्रवासबंदी जाहीर केली आहे. त्याचा फटकाही शेअर बाजाराला बसला आहे. दरम्यान, बुधवारी मुंबई शेअर बाजार बंद झाला तेव्हा निर्देशांक, 35,697 एवढा होता. आज सकाळी सुरुवातीलाच बाजारात 1600 अंकांची घसरण पाहायला मिळाली.