पुणे: सोशल मीडियावर कोरोनाग्रस्तांची नावे उघड करणाऱ्यांवर कारवाई होणार

पुणे: सोशल मीडियाच्या माध्यामातून कोरोनाग्रस्तांची (संशयित किंवा पॉझीटीव्ह) माहिती उघड झाल्याने कुटुंबियांवर बहिष्कार टाकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला, त्यासाठीच सरकारने हा निर्णय घेतला आहे.

कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची नावे सामाजिक माध्यमातून (सोशल मिडिया) उघड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल,असा इशारा विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिला आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. पुण्यातील कोरोना व्हायरस पॉझिटीव्ह रुग्णाचे नाव आणि ओळख काही माध्यमांनी आणि सोशल मीडियावर उघड केली होती. ‘आम्हालाही हा आजार होईल, तुम्ही गाव सोडून जा’ असं म्हणत त्या व्यक्तीच्या घरावर गावकर्‍यांनी बहिष्कार टाकला आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Loading