नाशिकच्या कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट: शहर: ९६.५९ टक्के तर ग्रामीण: ९३.४ टक्के

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ६२ हजार २४१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत १४ हजार ४०० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये ८४४ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ४ हजार ४७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा  नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १ हजार ३६१,  बागलाण ६५९, चांदवड ६१२, देवळा ५७८, दिंडोरी ६६६, इगतपुरी १३१, कळवण ५१६, मालेगाव ४९५, नांदगाव ४२८, निफाड १ हजार ४१, पेठ ५०, सिन्नर ७७९, सुरगाणा १७१, त्र्यंबकेश्वर ८३, येवला १६९  असे एकूण ७ हजार ७३९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ५ हजार ६४९, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार १२ तर जिल्ह्याबाहेरील एकही रुग्ण नसून असे एकूण १४  हजार ४००  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  ३ लाख  ८१  हजार १२० रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९३.०४  टक्के, नाशिक शहरात ९६.५९ टक्के, मालेगाव मध्ये  ८९.२९  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९८.०५ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.०५  इतके आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण २ हजार १६९ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ९०८ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३०३  व जिल्हा बाहेरील ९९ अशा एकूण ४ हजार ४७९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून दि. २६ मे २०२१ रोजी प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News