नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ६३ हजार ३०२ रुग्ण कोरोनामुक्त !

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ६३ हजार ३०२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत १४ हजार ३९७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत ४ हजार ५१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा  नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १ हजार २५०,  बागलाण ६२६, चांदवड ५९२, देवळा ५४२, दिंडोरी ६७१, इगतपुरी १३९, कळवण ५३८, मालेगाव ५१६, नांदगाव ४३०, निफाड ९५५, पेठ ५२, सिन्नर ९००, सुरगाणा १७२, त्र्यंबकेश्वर ८५, येवला १३३ असे एकूण ७ हजार ६०१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ५ हजार ८१३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ९८३ तर जिल्ह्याबाहेरील एकही रुग्ण नसून असे एकूण १४  हजार ३९७  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  ३ लाख  ८२  हजार २१३ रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९३.१६  टक्के, नाशिक शहरात ९६.५१ टक्के, मालेगाव मध्ये  ८९.५४  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९८.०५ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.०५  इतके आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण २ हजार १८५ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ९२७ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३०३  व जिल्हा बाहेरील ९९ अशा एकूण ४ हजार ५१४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

(वरील आकडेवारी दि. २७ मे रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

Loading