नाशिकच्या कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट: शहर: ९६.६३ टक्के तर ग्रामीण: ९२.४१ टक्के

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ६० हजार ६९७ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत १५  हजार २४४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये ७१५ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ४ हजार ४१४  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा  नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १ हजार ६११,  बागलाण ६८७, चांदवड ६३३, देवळा ५९९, दिंडोरी ७४८, इगतपुरी १३४, कळवण ५७४, मालेगाव ५१८, नांदगाव ४६५, निफाड १ हजार २६६, पेठ ५४, सिन्नर ८४०, सुरगाणा १९९, त्र्यंबकेश्वर ९०, येवला २०६  असे एकूण ८ हजार ६२४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ५ हजार ५७५, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ४५ तर जिल्ह्याबाहेरील एकही रुग्ण नसून असे एकूण १५  हजार २४४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  ३ लाख  ८०  हजार ३५५ रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९२.४१ टक्के, नाशिक शहरात ९६.६३ टक्के, मालेगाव मध्ये  ८९.०३  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९८.०५ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.८३  इतके आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण २ हजार १४५ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ८७० मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३०० व जिल्हा बाहेरील ९९ अशा एकूण ४ हजार ४१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून दि. २५ मे २०२१ रोजी प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

boat

Leave your vote

Log In

Forgot password?

Forgot password?

Enter your account data and we will send you a link to reset your password.

Your password reset link appears to be invalid or expired.

Log in

Privacy Policy

Add to Collection

No Collections

Here you'll find all collections you've created before.