रश्मी ठाकरे यांना पितृशोक…!


सुरज गायकवाड,

मुंबई : सामना’च्या संपादक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना पितृशोक झाला. रश्मी ठाकरे यांचे वडील आणि उद्धव ठाकरे यांचे सासरे माधव गोविंद पाटणकर यांचे मुंबईत निधन झाले. 

वयाच्या 78 व्या वर्षी माधव पाटणकर यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईत अंधेरी येथील क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. माधव पाटणकर यांची प्रकृती काही दिवसांपासून अस्वस्थ होती. त्यांच्यावर क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र आज त्यांचे निधन झाले.रश्मी ठाकरे यांचे माहेर डोंबिवलीचे होते. माधव पाटणकर आपला कौटुंबिक व्यवसाय सांभाळत होते.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत माधव पाटणकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून त्यांचे सासरे श्री माधव गोविंद पाटणकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.