खासदार अरविंद सावंत यांच्या परप्रांतीय कौतुकाबद्दल मनसेचा सवाल…!


सुरज गायकवाड,

मुंबई; राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडी स्थापन करून सत्ता हस्तगत केली आहे. या सत्ता स्थापनेनंतर शिवसेनेनं आपल्या काही मुद्यांवर आता मावळ भूमिका घेतलेली दिसून येत आहे. त्यातच आता दक्षिण  मुंबईचे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये ते करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीय मजुरांचे कौतुक करताना दिसतात.

अरविंद सावंत यांच्या या भूमिकेवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई यांनी जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रातील तरुणांच्या काम करण्याच्या क्षमेतवर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. परप्रांतीय मजुरांची स्तुती करुनच तुम्ही थांबला नाहीत, तर तुम्ही महाराष्ट्रात या स्वागत आहे, असे वक्तव्य केले. आपण मुंबईचे महाराष्ट्राचे खासदार आहात हे विसरु नका” ही आठवण सरदेसाईंनी खासदार अरविंद सावंत यांना करुन दिली आहे.


आपण महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांच्या रोजगाराच्या संधीचा विचार केला पाहिजे. तो न करता परप्रांतीय किती चांगलं काम करतात याची स्तुती करता?” या शब्दात सुनावलं आहे. “करोना संकटामुळे परप्रांतीय मजूर आपआपल्या राज्यात निघून गेले आहेत. त्यामुळे इथल्या तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. आपण महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांच्या पाठिशी भक्कमपणे उभं राहून त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. पण तुम्ही अवहेलना केलेली जाणवते, हे चुकीचं आहे” असे सरदेसाई म्हणाले आहेत.

Loading