लखनऊ: आधी कोरोनाव्हायरस त्यानंतर ब्लॅक, व्हाईट आणि येलो फंगस… याशिवाय कोरोनामुक्त रुग्णांमध्ये उद्भवणाऱ्या इतर आणखी गंभीर समस्या… या सर्वांशी लढा देत असताना आता आणखी एक व्हायरस देशात सापडला आहे. भारतात हर्पिस सिम्पेल्क्स व्हायरसचा (Herpes simplex virus) पहिला रुग्ण आढळला आहे.
हर्पिस सिम्पेल्क्स व्हायरस कोरोनासारखा जीवघेणा असल्याचं सांगितलं जातं आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील एका रुग्णालयात या व्हायरसची लागण झालेला रुग्ण सापडला आहे. गाझियाबादमधील डॉ. बीपी त्यागी यांनी सांगितलं, एका रुग्णाच्या नाकात हर्पिस सिम्प्लेक्स व्हायरस सापडलं आहे. भारतातील हे पहिलंच प्रकरण आहे. हा व्हायरस खूपच खत’रनाक आहे. जर यावर वेळीच उपचार झाले नाही तर कोरोनापेक्षाही जी’वघेणा ठरू शकतो. या रुग्णावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कोरोनातून बऱ्या झालेल्या ज्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे किंवा त्यांना आधीपासून दुसरा आजार आहे, त्यांना हर्पिस सिम्प्लेक्स व्हायरसतचा धो’का जास्त आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं. या आजारावरील उपचार खूप महाग आहे आणि हा आजार जी’वघेणा आहे.
कोरोनामुक्त रुग्ण या व्हायरसचा धोका जास्त आहे, त्यामुळे जे रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत, त्यांनी काळजी घ्यायला हवी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.