फ्रीमध्ये घरी आणा Mahindra ची कार; पाहा काय आहे कंपनीची ऑफर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): देशात कोरोना माहामारीमुळे अनेक सेक्टर्सला मोठा फटका बसला आहे. याचा सर्वाधिक गंभीर परिणाम ऑटो सेक्टरवर झाला आहे. यातून बाहेर येण्यासाठी अनेक ऑटो कंपन्या नव्या स्किम, ऑफर्स जारी करत आहेत. याचदरम्यान देशातील प्रमुख वाहन निर्माता कंपनी Mahindra ने आपल्या ग्राहकांसाठी एक फायनान्स स्किम आणली आहे. कंपनीच्या या स्किमचं नाव Own Now and Pay after 90 days असं आहे.

रिपोर्टनुसार, कंपनीने ही स्किम आपल्या ग्राहकांना सोपी-सहज, त्रा’समुक्त फायनान्स सर्विस उपलब्ध करुन देण्यासाठी ही ऑफर आणली आहे. कमर्शिअल सेगमेंटमध्ये आवश्यक सेवा देणाऱ्या ग्राहकांना तीन महिन्यानंतर पेमेंट करण्याचा पर्याय यात आहे. मागील वर्षी कंपनीने आपला स्वत:चा Own Online प्लॅटफॉर्म लाँच केला होता. ज्याच्या मदतीने ऑफलाईन फायनान्स पार्टनर्सला एक सहज ऑनलाईन कर्ज मंजुरीसारखे पर्याय निवडण्याची सुविधा मिळेल.

कंपनी Own Online प्लॅटफॉर्म अंतर्गत वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 3000 रुपयांच्या अ‍ॅक्सेसरीजसह ऑनलाईन बुकिंगवर 2000 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त लाभ देत आहे. या ऑफर्सशिवाय ग्राहक अ‍ॅक्सेसरीज, एक्सटेंडेड वॉरंटी किंवा वर्कशॉप पेमेंट्सही EMI मध्ये रुपांतरित करुन 3000 रुपयांचा कॅशबॅकही मिळवू शकतात.

कंपनी आपल्या ग्राहकांना सर्वात कमी व्याजदरावर (7.25 टक्के) 100 टक्के ऑन-रोड फंडिंगदेखील ऑफर करत आहे. या सर्व स्किमबाबत अधिक माहितीसाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाईटसह, जवळच्या डीलरशिपकडेही संपर्क करू शकता.

Loading

Leave your vote

Log In

Forgot password?

Forgot password?

Enter your account data and we will send you a link to reset your password.

Your password reset link appears to be invalid or expired.

Log in

Privacy Policy

Add to Collection

No Collections

Here you'll find all collections you've created before.