देशात 26/11 सारख्याच दहश’तवादी हल्ल्याची शक्यता! NIA ला बंगालमधून आला धमकीचा फोन

नवी दिल्ली: राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) एक कॉल आला आहे. कॉलरने असा दावा केला आहे, की देशात मोठा दहश’तवादी ह’ल्ला होऊ शकतो. कॉलरने यावेळी 26/11 सारखा कट रचला जात असल्याचं म्हटलं आहे. सध्या एनआयएने या प्रकरणी कारवाई सुरू केली आहे. पश्चिम बंगालमधील रानाघाट येथून हा कॉल आला असल्याचे सांगण्यात आले आहे. यानंतर सुरक्षा यंत्रणांना सतर्क केले गेले आहे.

3 जून रोजी आलेल्या या कॉलवर या व्यक्तीनं माहिती दिली, की हल्ल्यासाठी स्टील बुलेट आणि I ED नेपाळ आणि बांग्लादेशमार्गे त’स्करी करून आणण्यात आलं आहे. कॉलरनं म्हटलं, की येत्या काही काळातच मोठा ह’ल्ला होऊ शकतो. दावा केला जात आहे, की या दहश’तवादी ह’ल्ल्यासाठी 26/11 सारखाच कट रचला जात आहे. NIA कडे आलेल्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून याप्रकरणाचा तपास केला जात आहे.

मागील वर्षी 20 ऑक्टोबरलाही NIA च्या कंट्रोल रूममध्ये कॉल आला होता. कॉल करणाऱ्या व्यक्तीनं असा दावा केला होता, की तो पाकिस्तानच्या कराचीमधून बोलत आहे. त्यानं मुंबई विमानतळ आणि इंडियन पोलीस एस्टॅब्लिशमेंटवर एक मोठ्या ह’ल्ल्याची तयारी सुरू असल्याचं म्हटलं होतं.

JMB म्हणजेच जमात उल मुजाहिद्दीन बांगलादेशचे पश्चिम बंगालमध्ये एक चांगले नेटवर्क आहे जे जागतिक दहशतवादी संघटना अल कायदाशी संबंधित आहे. यासोबतच कॉलरने त’स्करीसाठी बांगलादेशातील मार्गाचाही उल्लेखही केला आहे. अशा परिस्थितीत एनआयए JMB च्या अँगलनंही याप्रकरणाचा तपास करू शकते.

दहशतवादी बर्‍याच दिवसांपासून देशाच्या विविध भागात ह’ल्ल्याचे कट रचत होते, पण गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणांच्या तत्परतेमुळे ते कोणताही मोठा हल्ला करण्यात अपयशी ठरले आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एनआयएने पश्चिम बंगालमधील 6 दहशतवाद्यांसह अल काय’दाच्या एकूण 9 कार्यकर्त्यांना अटक केली होती.

Loading