DRDO आज लॉन्च करणार 2-डीजी अँटी कोविड औषध

2-DG हे भारतीय शास्त्रज्ज्ञांनी बनवलेलं अँटी-कोविड औषध आहे. हे औषध कोरोना महामारीविरोधात गेमचेंजर ठरु शकतं तसंच कोरोनाला हरवण्यासाठी मोठं शस्त्र ठरु शकतं.

देशभरात कोरोनानं थैमान घातलं असून या महामारीविरोधात लढण्यासाठी देशाला आणखी एक हत्यार मिळालं आहे. 2-DG हे औषध आजपासून मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहे. 2-DG हे भारतीय शास्त्रज्ज्ञांनी बनवलेलं अँटी-कोविड औषध आहे. हे औषध कोरोना महामारीविरोधात गेमचेंजर ठरु शकतं तसंच कोरोनाला हरवण्यासाठी मोठं शस्त्र ठरु शकतं. DRDO च्या शास्त्रज्ज्ञांच्या रिसर्च आणि मोठ्या परिश्रमानंतर भारतानं कोरोनाविरोधात हे औषध तयार केलं आहे. यातून लोकांना दिलासा मिळण्याची पूर्ण आशा आहे. सोमवारी या औषधाच्या 10 हजार डोसची पहिली खेप लॉन्च केली जाईल. यानंतर हे औषध कोरोना रुग्णांना दिलं जाईल.

DRDO च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, की हे औषध रुग्णांना लवकर रिकव्हर होण्यासाठी मदत करतं तसंच त्यांची ऑक्सिजनवरील निर्भरतादेखील बरीच कमी करतं. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आज म्हणजेच आठवड्याच्या सुरुवातीला 2-DG औषधाच्या 10,000 डोसची पहिली खेप लॉन्च केली जाईल आणि रुग्णांना हे दिलं जाईल. निर्माते भविष्यात उपयोगी यावं यासाठी याचं उत्पादन वाढवण्यासाठी काम करत आहेत. हे औषध डॉक्टर अनंतर नारायण भट्ट यांच्यासह शास्त्रज्ज्ञांच्या एका टीमनं बनवलं आहे.

दुसऱ्या आणि तिसऱ्या क्लिनिकल ट्रायलमध्ये या औषधांचे खूप चांगले परिणाम दिसून आले आहेत. मे ते ऑक्टोबरदरम्यान झालेल्या ट्रायलमध्ये या औषधानं कोरोना रुग्णांवर चांगलं काम केलं तसंच ते सुरक्षितही ठरलं. या औषधामुळे कोरोना रुग्ण लवकर बरे झाले तसंच त्यांना ऑक्सिजन सपोर्टची गरजही पडली नाही. तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे, की हे औषध कोरोना विषाणूला जागीच थांबवतं आणि त्याचा प्रसार रोखतं. हे औषध एकप्रकारचं सूडो ग्लूकोज मोलेकल आहे.

ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाने (डीसीजीआय) 8 मे रोजी डीआरडीओनं विकसित केलेल्या अँटी कोविड औषधाच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे. कोरोना विषाणूची मध्यम ते गंभीर लक्षणे असणा-या रूग्णांच्या उपचारासाठी या औषधास उपयुक्त पद्धत म्हणून परवानगी आहे. 2-डीजी औषध पाकीटात पावडर स्वरूपात येते. हे औषध पाण्यात मिसळून प्यावे लागते. या औषधाच्या परिणामाबद्दल बोलायचं झालं तर, कोरोनाची लक्षणं असणाऱ्या रुग्णांवर 2 डीजी या औषधाचे उपचार केले ते रुग्ण साधारण वेळेपेक्षा लवकर बरे झाले.

Loading

Leave your vote

Log In

Forgot password?

Forgot password?

Enter your account data and we will send you a link to reset your password.

Your password reset link appears to be invalid or expired.

Log in

Privacy Policy

Add to Collection

No Collections

Here you'll find all collections you've created before.