जिल्ह्यात आजपर्यंत ३ लाख ४९ हजार ८७५ रुग्ण कोरोनामुक्त !

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ४९ हजार ८७५  कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत १८ हजार १३२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत ४ हजार १३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २ हजार १२३,  बागलाण ६०९, चांदवड ६१३, देवळा ५९५, दिंडोरी ६७१, इगतपुरी २०३, कळवण ५६१, मालेगाव ३६१, नांदगाव ३२३, निफाड १ हजार १६४, पेठ ८२, सिन्नर १ हजार २५९, सुरगाणा ३१५, त्र्यंबकेश्वर १९०, येवला २३८ असे एकूण ९ हजार ३०६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ७ हजार ४७०, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ३३६ तर जिल्ह्याबाहेरील २० असे एकूण १८ हजार १३२  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ७२ हजार १३७ रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये ९१.७७ टक्के, नाशिक शहरात ९५.७६ टक्के, मालेगाव मध्ये  ८६.६५  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.६६  टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.०२ इतके आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण १ हजार ९९२ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  १ हजार ७५४  मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २८५  व जिल्हा बाहेरील ९९ अशा एकूण ४ हजार १३०  रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून दि. १८ मे रोजी प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News