भारतात कहर! 4000 पार कोरोना बाधितांची संख्या, तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट

भारतात कोरोना बाधितांचा आकडा 4000 पार गेला असून तब्लिगींमुळे कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ झाली असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

कोरोनापुढे अख्खं जग हतबल झालं असून भारतातही कोरोना फोफावत आहे. रविवारी राजस्थान, गुजरातमध्ये प्रत्येकी एक-एक, महाराष्ट्रात तीन आणि तामिळनाडूमध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तसेच आंध्रप्रदेशमध्ये 34, महाराष्ट्रात 26, राजस्थानमध्ये सहा, गुजरातमध्ये 14, मध्यप्रदेशमध्ये 12 नवीन कोरोना बाधित आढळून आले आहेत. यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली असून कोरोना बाधितांचा एकूण आकडा 4000 वर पोहोचला आहे. तर देशात या व्हायरसमुळे आतापर्यंत 109 लोकांचा मृत्यू झाला आहे.

दिल्लीमध्ये तब्लिगींमुळे कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ

आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 4000 कोरोना बाधितांपैकी 291 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. राजधानी दिल्लीमध्ये रविवारी कोरोनाचे 58 नवीन रूग्ण आढळून आले. राज्यामध्ये आतापर्यंत संख्या 500 पार पोहोचली आहे. तर फक्त दिल्लीमध्ये 320 कोरोना बाधित आहेत.

कोणत्या राज्यात किती रूग्णांचा मृत्यू?

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत महाराष्ट्रात सर्वाधिक 24 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर गुजरातमध्ये 11, तेलंगणामध्ये 7, मध्यप्रदेशमध्ये 9, दिल्लीमध्ये 7, पंजाबमध्ये 5, कर्नाटकात 4, पश्चिम बंगालमध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश आणि केरळमध्ये प्रत्येकी दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये तीन, आंध्रप्रदेश, बिहार आणि हिमाचल प्रदेशमध्ये प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News