पुण्यात एकाच दिवसात कोरोनामुळे 5 जणांचा मृत्यू

देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या 5 हजारच्या आसपास पोहोचली असताना महाराष्ट्रातील नवी धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

राज्यात कोरोनाग्रस्तांच्या आकडा हजार पार गेल्या आहे. सर्वाधिक धोका हा मुंबई पुण्यात असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे देशभरात आतापर्यंत 149 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. त्यातच धक्कादायक बाब म्हणजे पुण्यात आज सकाळी कोरोनागमुळे 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ससून रुग्णालयातील 3 जणांचा तर नायडू आणि नोबेलमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एकट्या पुण्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 13 वर पोहोचली आहे. पुणे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात रात्रभरात 60 जण कोरोना पॉझिटिव्ह

देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या 5 हजारच्या आसपास पोहोचली असताना महाराष्ट्रातील नवी धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. त्यापैकी जवळपास एका रात्रीमध्ये 60 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तब्बल 12 तासांत 60 रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यापैकी मुंबईत 12 तासांत 44, पुण्यात 9, अंगर, अकोला आणि बुलडाण्यात प्रत्येकी एक रुग्ण तर नागपुरात नवीन 4 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळले आहेत. देशभरात सर्वात जास्त रुग्णांची संख्या असणारं राज्य महाराष्ट्र आहे. 5 हजारपैकी 1 हजार 78 रुग्ण तर महाराष्ट्रातील आहेत. मंगळवारी 150 नवीन कोरोनाचे केसेस समोर आल्या होत्या त्यात आता अवघ्या 12 तासांत पुन्हा 60 जणांची भर पडली आहे.