तबलिकी तरुणानं निजामुद्दीनला गेल्याची माहिती लपवली, पुण्यात तब्बल 40 डॉक्टरांना धोका

महाराष्ट्रात कोरोनानं अक्षरश: थैमान घातलं आहे. राज्यात आतापर्यंत 700 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अशातच पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 40 डॉक्टरांना कोरोनाचा धोका असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यात काही सर्जन आणि डॉक्टरांचा समावेश आहे. त्या सगळ्यांना मेडिकल कॉलेजमध्ये क्वारंटाइन करण्यात आलं आहे. या डॉक्टरांनी एक रुग्णाची सर्जरी केली होती. या सर्जरीदरम्यान रुग्णाच्या काही टेस्ट केल्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. या रुग्णानं आपली माहिती लपवल्यामुळे त्याचा मोठा फटका पुण्यातील डॉक्टरांना बसरणार आहे.

हा रुग्ण दिल्लीतील निजामुद्दीन इथे पार पडलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला हजर होता ही माहिती त्याने डॉक्टरांपासून लपवून ठेवली होती. या रुग्णाचा एक अपघात झाला होता. त्यामध्ये इंटरनल ब्लिडिंग झाल्यामुळे त्याची सर्जरी करावी लागली होती. त्यानंतर दोन दिवस त्याला ताप येत होता. डॉक्टरांनी रुग्णाचा आईकडे या संदर्भात चौकशी केली त्यावेळी हा रुग्ण तबलिगी जमातच्या कार्यक्रमात हजर असल्याची माहिती समोर आली.

डॉक्टरांनी या रुग्णाच्या काही टेस्ट केल्यानंतर शनिवारी त्याचा रिपोर्ट आला या रिपोर्टमध्ये तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजल्यानंतर त्याच्यावर सर्जरी करणाऱ्यासह इतर डॉक्टरांनाही क्वारंटाइन करण्यात आलं आहे. या 40 डॉक्टरांच्या थुंकीचे आणि काही ब्लड सॅपल्स तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीला डॉक्टरांनी या रुग्णाच्या कुटुंबियांना आणि रुग्णाला ट्रॅव्हल हिस्ट्री विचारली असता त्यांनी नकार दिला होता. त्यावेळी कोणीही बोलायला तयार नव्हतं. ताप आल्यानंतर त्याच्या आईनं दिल्लीला जाऊन आल्याचा खुलासा केला. या 40 पैकी 30 जण हे रुग्णालयातील स्टाफ तर 10 डॉक्टरांचा समावेश आहे. त्या सर्वांचे सॅपल्स पाठवण्यात आले आहेत. त्यांचे रिपोर्ट काय येतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र एका रुग्णाच्या बेजबाबदारपणाचा फटका 40 जणांना बसला आहे.

Loading