creditcard

पुण्यातही मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन

axis

पुणे : मुंबईनंतर पुण्यातही मनसेने बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे. सातारा रस्त्यावरील धनकवडी परिसरात मनसैनिकांनी पोलिसांसोबत घेत सर्च ऑपरेशन केलं. यावेळी पुण्यातील मनसे अधिकाऱ्यांनी आठ संशयित बांगलादेशी कुटुंबियांना पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

No posts found.

ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित बांगलादेशींना चौकशीसाठी सहकारनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली असता, त्यांच्याकडे दोन मतदानपत्र आढळून आले. “जर हे प्रकरण गांभीर्याने घेतलं नाही, तर आम्ही मनसे स्टाईलने आंदोलन करु,” असा इशारा मनसे शहरप्रमुख अमोल शिंदे यांनी दिला आहे.

मुंबईतही बांगलादेशी घुसखोर

दरम्यान 13 फेब्रुवारीला मनसेने मुंबईत बोरीवली पूर्व चिकूवाडी या ठिकाणी बांगलादेशी घुसखोरांविरोधात आंदोलन केलं होतं. या ठिकाणी बांगलादेशी राहत असल्याचा दावा मनसे पदाधिकाऱ्यांनी केला होता. त्यानुसार मनसेने झोपडपट्टी परिसरात शोध मोहीम राबवत लोकांची चौकशी केली. त्यावेळी त्यांची कागदपत्रही तपासली. त्यांचा पेहराव आणि बोली भाषा बांगलादेशींसारखी असल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले होते.