creditcard

WhatsApp मध्ये चॅट बॉक्स ओपन न करताच वाचता येतील Message, पाहा काय आहे ट्रिक

axis

WhatsApp मध्ये चॅट बॉक्स ओपन न करताच वाचता येतील Message, पाहा काय आहे ट्रिक

No posts found.

नवी दिल्ली: व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) सर्वाधिक वापरलं जाणार मेसेजिंग अ‍ॅप आहे. अनेक जण व्हॉट्सअ‍ॅपचा मोठ्या प्रमाणात वापर करत असताना, युजर्सच्या गरजा लक्षात घेत कंपनीकडून अनेक अपडेटही दिले जातात. व्हॉट्सअ‍ॅप मेसेज नोटिफिकेशनमध्ये वाचता येतात. पण एका ट्रिकद्वारे चॅट बॉक्स ओपन न करताच, व्हॉट्सअ‍ॅप ओपन न करता मेसेज वाचता येतात.

यासाठी सर्वात आधी होम स्क्रिनवर लाँग प्रेस करावं लागेल, त्यानंतर स्क्रिनवर एक मेन्यू दिसेल. आता Widgets वर क्लिक करावं लागेल. इथे अ‍ॅपचे सर्व शॉर्टकट मिळतील. इथे व्हॉट्सअ‍ॅप शॉर्टकट ओपन करुन त्यावर क्लिक करावं लागेल. त्यानंतर ‘4×1’ व्हॉट्सअ‍ॅप ऑप्शन निवडावा लागेल. यात व्हॉट्सअ‍ॅप होम स्क्रिनवर अ‍ॅड करता येतं आणि Widget वाढवताही येतं.

त्यानंतर स्क्रिनवर दिसणाऱ्या दुसऱ्या स्लाईडवर क्लिक करा आणि अ‍ॅड बटणवर क्लिक करुन widget होम स्क्रिनवर येईल. सर्व अँड्रॉईड युजर्स नवे आणि जुने सर्व प्रकारचे मेसेजेस अशारितीने सहजपणे वाचू शकतात. वेब व्हॉट्सअ‍ॅप मेसेज – जर मेसेज वेब व्हॉट्सअ‍ॅपमध्ये वाचायचे असतील, तर तेदेखील सहजपणे चॅट ओपन न करताच वाचता येतात. त्यासाठी वेब मेसेजवर केवळ कर्सल घेऊन जावा लागेल. त्यानंतर मेसेज वरच दिसेल. अशारितीने चॅट बॉक्स न ओपन करताच मेसेज वाचता येतील. वेब व्हॉट्सअ‍ॅपवर केवळ नवे मेसेज पाहता येतील. जुने मेसेज दिसणार नाहीत.