मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्रातील वेदिका शिंदे, ह्या पुण्यातल्या 11 महिन्यांच्या मुलीला एसएमए प्रकार- 1 असल्याचे निदान केले. हा एक दुर्मिळ जेनेटीक आजार असून 2 वर्षांच्या आधीच शिशुचे प्राण जाऊ शकतात. वेदिकाच्या बाबतीत निदान अतिशय लवकर होत असून आज तिला 16 कोटींचे इंजेक्शन देण्यात आले आहे.
गेली कित्येक दिवस ज्या इंजेक्शनच्या प्रतीक्षेत 11 महिन्याची व वेदिका शिंदे आणि कुटुंबिय होते. चार महिन्यांपासून पिंपरी चिंचवड येथील सौरभ शिंदे यांनी आपल्या मुलीच्या दुर्मिळ आजाराच्या उपचारासाठी लागणारे 16 कोटी रुपये तीन महिन्यात क्राऊडफंडिंग च्या माध्यमातून जमा केले होते.
वेदिकाला लागणारे जीन रिप्लेसमेंटचे झोलजेन्स्मा’ हे औषध दोन दिवसापूर्वीच रुग्णालयात अमेरिकेतून आले होते. ते आज वेदिकाला पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला देण्यात आले. एका वेळेसचा जनुक बदलण्याचा उपचार असलेल्या झोलजेंस्माची किंमत 16 कोटी रूपये आहे आणि मुलीला वाचवण्यासाठी ते आयात करणे भाग होते.
वेदिकाच्या पालकांनी त्यांची समस्या फंडरेझिंग माध्यम मिलापवर सांगितली आणि जगभरातील ऑनलाईन दात्यांना मदतीची विनवणी केली. इंजेक्शनचा डोस घेतल्यानंतर तिच्या आई-वडिलांना आनंद झाल्याचे फोटोत दिसून येत आहे. यासाठी ते सर्वांचे आभारी देखील आहेत.
सरकारी यंत्रणांकडून कर आणि आयात शुल्क माफ करण्यामध्ये पालकांना यश आले. डॉक्टरांनी आधीच एका प्रसिद्ध अमेरिकन फार्मासुटीकल कंपनीला झोलजेंस्मासाठी विनंती केली होती. या महिन्यात असेलल्या पहिल्या वाढदिवसाआधी वेदिकाने हे इंजेक्शन घेतले. वेदिकाला लागणारे जीन रिप्लेसमेंटचे झोलजेन्स्मा’ हे औषध दोन दिवसापूर्वीच रुग्णालयात अमेरिकेतून आले होते
लहान मुलांचे न्यूरॉलॉजिस्ट डॉ. संदीप पाटील वेदिकाला उपचार देत आहेत, त्यांनीच हे औषध वेदिकाला दिले. या संपूर्ण औषधांचा खर्च उभारण्यासाठी मला माझे नातेवाईक मित्र परिवार आणि त्यापेक्षा असे दानशूर व्यक्ती आहे जे मला माहीतही नाही. या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे
खूप दिवसापासून आम्ही हे इंजेक्शन मिळण्याच्या प्रतीक्षेत होतो. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मधील सर्व व्यवस्थापनाचा आभारी आहे त्यांनी आतापर्यंत सहकार्य केले आहे.” सौरभ शिंदे यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना या प्रवासाबद्दल बोलताना सांगितले की, “या औषधासाठी लागणारी संपूर्ण 16 कोटी रक्कम क्राऊड फंडिंगमधून जमा करण्यात आली होती.