मुंबई : अयोध्येतील श्री राम जन्मभूमीत निर्माण होणाऱ्या रामलल्ला मंदिराच्या भूमीपूजन सोहळ्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहाण्याची शक्यता आहे. या सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात येणार असल्याचीही माहिती आहे.
तसेच,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्ट रोजी रामलल्ला मंदिर निर्माणाचं भूमीपूजन होणार आहे. या वेळी देशभरातील मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. अयोध्येतील राम मंदिर निर्माणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं अनेकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता अयोध्येत राम मंदिर निर्माण करण्याचं निश्चित झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भूमीपूजन सोहळ्यास हजरे लावतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.