देशात कोरोनाचा विस्फोट! 24 तासांत 606 रुग्णांचा मृत्यू, तर रुग्णांमध्ये पुन्हा झाली विक्रमी वाढ

गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात तब्बल 32 हजार 695 नवीन रुग्णांची नोंद झाली. यासह 606 रुग्णांचा मृत्यू झाला. एकाच दिवसात आतापर्यंत सापडलेली सर्वात जास्त रुग्णांची नोंद आहे. यासह आता देशात एकूण 9 लाख 68 हजार 876 रुग्ण झाले आहे. सध्या देशात 3 लाख 31 हजार 146 सक्रिय रुग्ण आहेत. तर, 6 लाख 12 लाख 815 लोक निरोगी झाले आहे. एकूण मृतांचा आकडा 24 हजार 915 झाला आहे.

गेल्या 24 तासात 3 लाख कोरोना व्हायरस चाचणी झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात 1 कोटी 27 लाख 39 हजार 490 लोकांची चाचणी झाली आहे.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News