चीन विषयी जपानने घेतला ‘हा’ कठोर निर्णय

NCAD

नवी दिल्ली : कोरोना सारख्या महामारीची सुरवात जेथून झाली. त्या चीनला एका मागून एक हादरे बसत आहे . एकीकडे भारत, अमिरेका तैवान यांनी चीनशी असलेले व्यवसायिक संबंध तोडल्यानंतर आता आणखी एका देशाने कठोर निर्णय घेतला आहे. जपानने चीनला झटका देत 57 कंपन्यांना मायदेशी परत आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चीनला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे जपान सरकार या कंपन्यांचा खर्च उचलण्यासाठीही तयार आहे. चीनवरील निर्भरता कमी करण्यासाठी जपानने हा निर्णय घेतला आहे. मात्र जपानच्या या निर्णयामुळे चीनला हजारो कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे.

चीनला बसलेला हा चौथा सर्वात मोठा झटका आहे. याआधी भारताने चीनने देशातून बाहेर काढले. चिनी अप्स बॅन करून चीनला पहिला दणका दिला. त्यानंतर अमेरिकेनही चिनी कंपनीसाठी आपले दरवाजे बंद केले. तैवानेही चीनसोबत असलेले संबंध संपवले, आता जपान हा तिसरा देश आहे, ज्याने चीनला आर्थिक झटका दिला आहे.

पैसे देऊन बाहेर कंपन्या मायदेशी आणणार जपान

जपानी कंपन्या मायदेशी परत आणण्यासाठी सरकारकडून सर्व सहकार्य देण्यात येणार आहे. यासाठी एक निधीही जाहीर करण्यात आळा आहे. जपानी कंपन्यांवर कोणताही परिणाम होऊ नये आणि त्यांनी चीनवर अवलंबून राहू नयेत म्हणून जपान सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. जपानने चीनमधील सर्व 57 जपानी कंपन्यांना मायदेशात येऊन उत्पादन घेण्यासाठी आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीने 54 कोटी डॉलर्सचा निधी जाहीर केला आहे. सरकार सर्व जपानी कंपन्यांना मायदेशात परत आणण्यासाठी एकूण 70 अरब येन खर्च करणार आहे. व्यापाराबरोबच चीनचे परराष्ट्रसंदर्भातील धोरण सर्वांच्या सहकार्याने काम करण्याचे नाही आहे, असे जपानचे म्हणणे आहे. चीनबरोबरच व्हिएतनाम, म्यानमार, थायलंड आणि इतर दक्षिण पूर्व आशियाई देशांमधील जपानी कंपन्यांनी पुन्हा आपल्याच देशात येऊन उद्योग करावा यासाठी सरकराने हालचाली सुरु केल्या आहेत.

Leave your vote

Log In

Forgot password?

Forgot password?

Enter your account data and we will send you a link to reset your password.

Your password reset link appears to be invalid or expired.

Log in

Privacy Policy

Add to Collection

No Collections

Here you'll find all collections you've created before.