नाशिक-गांधीनगरला अखेर तो बिबट्या जेरबंद

नाशिक : गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कूल (कॅट्स)च्या हेलिकॉप्टर उड्डाणाच्या धावपट्टीपासून अगदी दीडशे ते दोनशे मीटर अंतरावर असलेल्या गवताळ भागात लावलेल्या वनविभागाकडून पंधरवड्यापुर्वी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात शनिवारी (दि.२९) सकाळी प्रौढ नर बिबट्या जेरबंद झाला.

कॅट्सच्या आवारात असलेला जंगलाचा परिसर आणि निर्मनुष्य भाग यामुळे या भागात बिबट्यासारख्या वन्यजीवांचा वावर असल्याच्या तक्रारी वारंवार संबंधित लष्करी अधिकाऱ्यांकडून नाशिक पश्चिम वनविभागाकडे पत्रांद्वारे केल्या जातात. असेच एक पत्र सोमवारी (दि.१०) वनविभागाला कॅट्सकडून प्राप्त झाले होते. या पत्राची दखल घेत वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, वनपाल मधुकर गोसावी, उत्तम पाटील आदींनी कॅट्सच्या परिसरात भेट देत पाहणी करून बिबट असल्याची खात्री पटविली.

यानंतर बुधवारी (दि.१२) वनकर्मचा-यांनी या भागात पिंजरा तैनात केला.दरम्यान, दररोज वनकर्मचा-यांकडून या पिंज-याबाबतची माहिती कॅट्समधील कर्मचा-यांकडून जाणून घेतली जात होती. तसेच दोन ते तीन दिवसानंतर वनरक्षक पाटील हे पिंजरा लावलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करत होते. पिंज-यात बिबट्या जेरबंद होत नव्हता. त्यामुळे त्यांनी या भागात पाहणी करून बिबट्याच्या संचाराच्या पाऊलखुणांद्वारे माग काढला आणि काही दिवसांपुर्वी त्यांनी पिंज-याची जागा बदलली. कॅट्सच्या पोस्ट क्रमांक-१ आणि हेलिकॉप्टरच्या हॅँगर या दोघांमधील मोकळ्या भागातील गवताने वेढलेल्या परिसरात पिंजरा लावण्यात आला.

या पिंज-यात बुधवारी मध्यरात्री बिबट्या अडकला. सकाळी सात वाजेच्या सुमारास कॅट्समधून वनकर्मचा-यांना बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावण्यात आलेल्या पिंज-याचा दरवाजा खाली पडल्याची माहिती देण्यात आली. तत्काळ वनधिकारी व कर्मचा-यांनी घटनास्थळ गाठत खात्री केली असता बिबट्या पिंज-यात जेरबंद झालेला होता. तत्काळ वन्यप्राणी रेस्क्यू वाहनाद्वार बिबट्याला पिंज-यातून वनविभागाने कॅट्समधून गंगापूर धरणालगतच्या वनविभागाच्या रोपवाटिकेत हलविले.”,

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News