शिल्पा शेट्टी पुन्हा आई झाली, नन्ही परीचा फोटो केला शेअर

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा दुसऱ्यांदा आई बनली आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना आधी विआन नावाचा मुलगा आहे. आता पुन्हा दुसऱ्यांदा शिल्पा शेट्टीने मुलीला जन्म दिला आहे. याबाबत स्वत: शिल्पाने फोटो शेअर करत माहिती दिली आहे. शिल्पाने शेअर केलेल्या या पोस्टनंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

शिल्पाने सरोगसीद्वारे मुलीला जन्म दिला आहे. १५ फेब्रुवारी रोजी शिल्पा-राजच्या मुलीचा जन्म झाला. शिल्पा आणि तिचा पती राज कुंद्रा यांनी अधिकृतरित्या माहिती देत याबाबत सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये शिल्पाने तिच्या मुलीच्या नावाचाही खुलासा केला आहे. चिमुकलीचा हात हातात घेत शिल्पाने फोटो शेअर केलाय. 

शिल्पा आणि राज यांनी मुलीचं नाव समिषा शेट्टी ठेवलं असून शिल्पाने तिच्या नावाचा अर्थही पोस्टमधून सांगितला आहे. शिल्पाच्या या पोस्टनंतर चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News