भारतात दुसऱ्या लाटेसाठी कारणीभूत असणाऱ्या कोरोनाचं असं आहे स्वरुप…

भारतामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी कारणीभूत असणारा कोरोना व्हेरिएंट B.1.1.7 चा पहिला फोटो समोर आला आहे.

भारतामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी कारणीभूत असणारा कोरोना व्हेरिएंट B.1.1.7 चा पहिला फोटो समोर आला आहे. कोरोनाचा हा व्हेरिएंट किती घा’तक आहे, हे या फोटोतून जाणवत आहे. या फोटोमधून कोरोना शरीराच्या पेशींना कसा चिकटून राहतोय ते स्पष्टपणे दिसत आहे. या स्ट्रेनमुळे अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची दुसरी लाट निर्माण झाली आहे. कॅनेडियन संशोधकांनी या व्हेरिएंटची पहिली मॉलिक्यूलर प्रतिमा प्रसिद्ध केली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरच्या मध्यात, जागतिक आरोग्य संघटने (WHO) ने B.1.1.7 व्हेरिएंटची माहिती दिली होती. यात विलक्षण प्रमाणात म्युटेशन पाहायला मिळते आहे.

बी. सी. विद्यापीठाने अशी माहिती दिली की, रिसर्चर्स SARS-CoV-2 स्पाइक प्रोटीनच्या एका भागात आढळून आलेल्या म्युटेशनची स्ट्रक्चरल इमेज प्रकाशित करणारी टीम आहे. स्पाइक प्रोटीन विषाणूचा तो भाग असतो जो संक्रमणासाठी कारणीभूत असतो. तर म्युटेशन म्हणजे तो बदल असतो ज्यामुळे विषाणू वेगाने पसरतो.

कोरोनाचा हा व्हेरिएंट इतका खतरना’क का?
ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाने (UBC) एका निवेदनात असं म्हटलं आहे की B.1.1.7 व्हेरिएंटच्या फोटोमुळे तो इतका खतरनाक का आहे हे स्पष्ट होत आहे. हा व्हायरस इतका संक्रामक का आहे, याबाबत देखील माहिती मिळते आहे. का या व्हायरसमुळे भारत, इंग्लंडमध्ये हाहाकार माजला आहे आणि आता कॅनडामध्ये देखील समस्या वाढल्या आहे. UBC ने असं म्हटलं आहे की हे फोटो नियर अटॉमिक रेझॉल्यूशनमध्ये आहे.

UBC च्या मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये बायोकेमेस्ट्री आणि मॉलिक्यूलर बायोलॉजी विभागातील प्रोफेसर डॉ. श्रीराम सुब्रमण्यम यांच्या नेतृत्वाखालील टीमने असं म्हटलं आहे की, या फोटोतून असं स्पष्ट होतंय की हा व्हायरस माणसाच्या शरीरातील पेशींमध्ये सहजरित्या प्रवेश करू शकतो.

दरम्यान व्हायरसशी सामना करण्यासाठी सध्या मानवजातीकडे व्हॅक्सिन हा एकमेव उपाय आहे. अलीकडेच पीएलओएस बायोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या या टीमच्या विश्लेषणातून हे देखील स्पष्ट झालं आहे की, सध्याच्या लशींच्या माध्यमातून व्हायरसचे म्युटेशन संपवले जाऊ शकते. अहवालात असे म्हटले आहे की, ‘आम्हाला जे फोटो मिळाले आहेत त्यामध्ये  N501Y म्युटेशनची पहिली स्ट्रक्चरल झलक दिसत आहे. यामुळे हे देखील समजते की N501Y म्युटेशन B.1.1.7 व्हेरिएंटमध्ये एकमेव म्युटेशन आहे जो स्पाइक प्रोटीनच्या भागावर आहे.’

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News