पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत शाळा बंद ठेवण्यात याव्या

महाराष्ट्र ; नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत असताना करोना पार्श्वभूमीवर शैक्षणिक कामकाज कसे सुरू होणार याकडे शैक्षणिक जगताचे लक्ष लागून होते. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रधुर्भाव बघता शाळा कशा सुरु करता येतील यावरून विद्यार्थी-पालक यांनाही याविषयी प्रश्न निर्माण झाले होते. मात्र करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत शाळा बंद ठेवण्यात याव्यात, असे आदेश सोमवारी शाळांना शिक्षण विभागाकडून प्राप्त झाले आहेत.

१५ जून रोजी शैक्षणिक वर्ष सुरू होणार असल्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले होते आणि शिक्षकांना शाळेत हजर राहण्याच्या आदेश देण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी शाळेचा पहिला दिवस सुरु होत असताना शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळांमध्ये हजेरी लावली.  मात्र शिक्षण विभागाकडून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत शैक्षणिक कामकाज करण्यात येऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत. ‘गेले दोन ते तीन महिने कोविंड १९ या भयानक संकटाशी जग लढत आहे. अनेक मुख्याध्यापक, शिक्षक, अधिकारी, नागरिक पालक, संस्था याच्याशी लढत आहेत.

अनेक शाळांमध्ये आवश्यकतेनुसार विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. यापार्श्वभूमीवर सण २०२०-२१ या वर्षाचे शैक्षणिक वर्ष १५ जून पासून सुरु करण्यात येणार असल्याचे सूचित केले होते.अद्याप शासनाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून शाळा सुरू करण्याबाबत आदेश प्राप्त झालेले नाहीत.त्यामुळे शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत शाळा बंद ठेवाव्यात’, असे निर्देश कोल्हापूरचे माध्यमिक शाळा शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी परिपत्रकाद्वारे शाळांना कळवले आहे. याबाबत काही शंका अडचणी असतील तर तालुका उपशिक्षण अधिकारी विस्तार अधिकारी शिक्षण यांच्याशी संपर्क साधावा असेही या पत्रात म्हटले आहे.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News