‘संदीप और पिंकी फरार’ च्या ट्रेलरमध्ये अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्राची डार्क कॉमेडी !

अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा यांच्या आगामी चित्रपट “संदीप और पिंकी फरार”चे पोस्टर रिलीज झाल्यानंतर चित्रपटाचा ट्रेलरही आज समोर आला आहे. 2 मिनिटांच्या 27 सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा उत्कृष्ठ काम करताना दिसत आहेत.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अर्जुन कपूर हरियाणवी पोलिस अअधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसत आहे, तर परिणीती चोप्रा कॉर्पोरेट जगतात काम करणारी मुलगी आहे. ट्रेलर बऱ्यापैकी इंटेन्स आहे. ट्रेलरमध्ये अरुण कपूर आणि परिणीती चोप्राशिवाय पंकज त्रिपाठी, जयदीप अहलावत, अर्चना पूरन सिंग आणि संजय मिश्रा आणि नीना गुप्ता हेही मुख्य भूमिकेत आहेत. त्याचवेळी जयदीप अहलावत पुन्हा एकदा व्हिलनच्या भूमिकेत दिसला आहे.

https://www.youtube.com/watch?v=vHiLZkR6rSg

चित्रपटात एक ट्विस्ट आहे कारण चित्रपटाचे नाव वाचणाऱ्यांना प्रथमच असे वाटते की पिंकी हे परिणीतीचे नाव आहे आणि संदीप अर्जुन आहे. तसे नसून अर्जुनचे नाव पिंकी दहिया आहे आणि परिणीती या चित्रपटात संदीप कौरची भूमिका साकारत आहेत. यश राज फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मित आणि दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित ‘डार्क कॉमेडी’ संदीप और पिंकी फरार ‘येत्या 20 मार्च रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.