निर्भया प्रकरण: पवनची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली, चौघांचेही कायदेशीर पर्याय संपले

२०१२ मध्ये दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील चार दोषींपैकी एकाची म्हणजेच पवनची दया याचिका राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी बुधवारी फेटाळून लावली. अन्य तीन दोषींची दया याचिका राष्ट्रपतींनी यापूर्वीच फेटाळली आहे. पवनची दया याचिका फेटाळल्यानंतर चारही दोषींचे सर्व कायदेशीर पर्याय संपले आहेत.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला (एनएचआरसी) चारही दोषींची मानसिक आणि शारीरिक तपासणी तपासणी करण्याचे निर्देश देण्याच्या याचिकेवर सुनावण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी सकाळी नकार दिला.

ख्य न्यायाधीश डी.एन. पटेल आणि न्यायमूर्ती सी. हरि शंकर यांच्या खंडपीठाने म्हटले की ही याचिका सुनावणी योग्य नाही कारण ती एनएचआरसीसमोर प्रथम सादर करावी. यापूर्वी सोमवारी या चार दोषींना फाशी देण्यास पुढील आदेश येईपर्यंत पटियाला हाऊस कोर्टाने स्थगिती दिली होती. जुन्या डेथ वॉरंटनुसार सर्व दोषींना 3 मार्च रोजी सकाळी सहा वाजता फाशी देण्यात येणार होती. कोर्टाच्या निर्णयानंतर ते पुढे ढकलले गेले.

Loading