पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा, वादग्रस्त तीन कृषी कायदे मागे घेणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा, वादग्रस्त तीन कृषी कायदे मागे घेणार

नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (दि. १९ नोव्हेंबर) देशातल्या जनतेला संबोधित केलं.

यावेळी पंतप्रधान मोदींनी मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे, मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची माहिती दिली आहे.

तीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हितासाठीच आणले, असं म्हणत मोदींनी यावेळी पुन्हा एकदा कृषी कायद्यांचं समर्थन देखील केलं.

या, नवी सुरुवात करुया,असं म्हणत मोदींना शेतकऱ्यांना आवाहन केलंय. नोव्हेंबर अखेरीस सुरु होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात तीनही कृषी कायदे माघारी घेण्याची संवैधानिक प्रक्रिया सुरू केली जाईल, असं आश्वासनही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी दिलंय.

शेतकऱ्यांना आम्ही समजावण्यात कमी पडलो आहोत. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत असं सांगून शेतकऱ्यांनी आता आंदोलन संपवून आपल्या घरी जावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. सुरुवातीला गुरु नानक यांनी महत्त्वाची शिकवण दिल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या समस्या मी जवळून पाहिल्या असल्याचं मोदी म्हणालेत. तसंच माझ्या सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोत्तम प्राधान्य दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरकारकडून मदत करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. पंतप्रधानांनी आजच्या संबोधनात संदेशात शेतकऱ्यांच्या योजनांबाबत महत्त्वाची दिली आहे.

गेल्या 4 वर्षांत 1 लाख कोटीहून अधिक शेतकऱ्यांना मदत करण्यात आली. तसंच केंद्र सरकारचं कृषी बजेट पहिल्यापेक्षा 5 पटीनं वाढल्याचं ते म्हणालेत. शेतकऱ्यांच्या खात्यात 1 लाख 62 हजार कोटी रुपये थेट जमा केले. अधिकाधिक शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ दिल्याचंही त्यांनी सांगितलं.

100 पैकी 80 शेतकऱ्यांकडे कमी जमीन आहे. शेतकऱ्यांसाठी कृषीकर्ज दुप्पट केलं. शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठीच तीन कृषी कायदे आणले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी आजपासून तीन दिवस उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असतील. पण उत्तर प्रदेशला रवाना होण्यापूर्वी त्यांना देशाला संबोधित केलं. पीएमओनं या संदर्भातलं ट्विट करुन माहिती दिली होती.

Loading