12 वर्षांच्या खालील मुलांना देणार कोरोना वॅक्सिन!
मुंबई : अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय.
तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम मुलांवर जास्त होऊ शकतो.
अशा परिस्थितीत, सिंगापूर पुढील वर्षी जानेवारीमध्ये 12 वर्षांखालील मुलांसाठी कोविड-19 राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाचा विस्तार करण्याची शक्यता आहे.
आरोग्य मंत्रालयातील वैद्यकीय सेवा संचालक केनेथ मॅक यांनी मंत्रालयांच्या टास्क फोर्सच्या पत्रकार परिषदेत सांगितलं की, कोविड-19 च्या एकूण प्रकरणांपैकी 11.2 टक्के प्रकरणं 12 वर्षाखालील मुलांमध्ये आढळून आली आहेत. त्यांनी सांगितलं की, चार आठवड्यांपूर्वी हे प्रमाण 6.7 टक्के होते. 12 ते 20 वयोगटातील लोकांमधील प्रकरणांचे प्रमाण तसं बदललेले नाही. तसंच सतत चार ते पाच टक्क्यांच्या दरम्यान राहत असल्याचं त्यांनी म्हटलंय.
एका न्यूज चॅनलच्या म्हणण्याप्रमाणे, “ही मुलं असुरक्षित आहेत कारण ते अद्याप संसर्गापासून संरक्षण करणार्या लसीकरणासाठी ते पात्र नाहीत. त्यांना मास्क घालणं आणि सोशल डिस्टंसिंग पाळणं तसंच उपायांचे पालन करणं सामान्यतः कठीण आहे.
मुंबईत कोरोना वाढतोय!
मुंबईतील काही भागांतून कोरोनाची नवीन प्रकरणं सातत समोर येतायत. त्यामुळे शनिवारी बृहन्मुंबई महानगरपालिकेने 13 इमारती सील केल्या आहेत. शनिवारी मुंबईत कोरोनाचे एकूण 195 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर एका व्यक्तीचा विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे.