प्रत्येकाच्या खिशाला परवडणारा Jio SmartPhone लवकरच बाजारात!

प्रत्येकाच्या खिशाला परवडणारा Jio SmartPhone लवकरच बाजारात!

मुंबई : फोन बनवणाऱ्या कंपन्या भारतीय बाजारपेठेत आपले उपकरण एकत्र करण्यासाठी पार्टनर शोधत असतात. मुकेश अंबानींची दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओचा पहिला 4G स्मार्टफोन, जिओफोन नेक्स्ट, बराच काळ चर्चेत राहिला.

हे उपकरण एकत्र करण्यासाठी कंपनीने UTL Neolync सोबत हातमिळवणी केली आहे. नवीन माहितीनुसार, UTL Neolync सह Reliance Jio पुढील 6 महिन्यांत 5 दशलक्ष युनिट बाजारात आणू शकते. रिलायन्स जिओने आपला आगामी जिओफोन नेक्स्ट विकसित करण्यासाठी गुगलसोबत करार केला आहे.

कंपनी पुढील 6 महिन्यांत सर्व 5 दशलक्ष युनिट आणू शकते. जिओला चिपसेटच्या कमतरतेची जाणीव आहे असा दावाही अहवालात करण्यात आला आहे. जिओफोन नेक्स्ट हँडसेट 10 सप्टेंबर 2021 रोजी येणार आहे.

JioPhone ची वैशिष्ट्ये:
मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओने कंपनीच्या परवडणाऱ्या 4G स्मार्टफोन जिओफोन नेक्स्ट फीचर्सबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. परंतु असे म्हटले जात आहे की फोन अँड्रॉइड 11 वर कार्य करेल आणि त्यात 2 जीबी / 3 जीबी रॅम आणि 16 जीबी / 32 जीबी स्टोरेज एंट्री-लेव्हल क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 215 चिपसेटसह असू शकते. हा फोन  3,499 रुपयांना मिळणार आहे
JioPhone नेक्स्ट फीचर्स बद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला डिस्प्ले किती मोठा असेल हे देखील जाणून घ्यायला आवडेल, असे म्हटले जात आहे की फोनमध्ये 5.5 इंच स्क्रीन दिली जाऊ शकते. याशिवाय 2500 mAh बॅटरी दिली जाऊ शकते, 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर बॅक पॅनलवर दिला जाऊ शकतो.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News