Google Map चं खास फीचर, प्रवासाआधी कळणार टोलनाक्यांची संख्या आणि टोलची रक्कम
गुगल मॅपमुळे (Google Maps) अनेकदा प्रवास सोपा आणि आरामदायी वाटतो. रस्ता शोधणे, कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या मार्गावर ट्रफिक आहे, याची माहिती गुगल मॅपमुळे मिळते.
त्यामुळे ड्रायव्हिंग करताना लोक गुगल मॅपला प्राधान्य देतात. युजर्सच्या सोयीसाठी येत्या काही महिन्यांत गुगल मॅप्सचे नवे अपडेट येणार आहे. नव्या फिचरमुळे गुगल मॅप मार्गात येणाऱ्या टोल्सची किंमतही सांगेल. यामुळे प्रवास सुरू करण्याआधीच प्रवासादरम्यान किती टोल टॅक्स भरावा लागेल, याची माहिती मिळेल.
कंपनी सध्या या फिचरवर काम करत आहे. आधीपासूनच गुगल मॅप देशातील मार्गांवरील टोल ओळखतात आणि दाखवतात. या आधीच्या फिचरचा वापर करत त्याला अपडेट करत युजर्सला टोलची अंदाजे किंमत देण्याचे काम कंपनीने सुरू केले आहे.
वेळेची बचत होणार: मीडिया रिपोर्टनुसार, कंपनी गुगल मॅप्समध्ये असे फीचर आणत आहे, जे प्रवासादरम्यान वाटेत पडणाऱ्या प्रत्येक टोलच्या शुल्काची माहिती देईल. यामुळे युजरच्या वेळेची बचत होण्यास मदत होईल.
गूगलकडून सर्वेक्षण पूर्ण: प्रीव्यू प्रोग्रामच्या एका सदस्यला या फीचरवर काम करताना पाहिलं गेलं आहे. टोलची किंमत कशी डिस्प्ले होते, हे फीचर लागू करण्यासाठी यूजरचे सर्वेक्षण करताना पाहिले गेले आहे. यूजर्ससाठी हे फीचर कधी आणलं जाणार, किती वेळ लागेल याबाबत गूगलकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
टोलनाक्यांची यादी जाहीर केली जाईल: माध्यमांच्या अहवालांनुसार, गुगल मॅपचे हे फीचर यूजर्सना वाटेत पडणाऱ्या सर्व टोलचे स्थान तसेच त्यांच्या शुल्काची माहिती मिळेल. या व्यतिरिक्त ही यादी गुगलद्वारे देखील जारी केली जाईल.