नाशिक जिल्ह्यात इतक्या कोरोना रुग्णांवर उपचार सुरु; तालुकानिहाय आकडेवारी
नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९५ हजार ७७७ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत ९८० रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत ८ हजार ५७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ४२, बागलाण २३, चांदवड ३०, देवळा ४०, दिंडोरी २०, इगतपुरी १८, कळवण ००, मालेगाव २६, नांदगाव ०९, निफाड ९३, पेठ ००, सिन्नर १६३, सुरगाणा ०१, त्र्यंबकेश्वर ०३, येवला ३३ असे एकूण ५०१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ४२१ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ४७ तर जिल्ह्याबाहेरील ११ रुग्ण असून असे एकूण ९८० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ५ हजार ३३४ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९६.९९ टक्के, नाशिक शहरात ९८.०९ टक्के, मालेगाव मध्ये ९६.८० टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.६० टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.६४ इतके आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण ४ हजार १२८ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ३ हजार ९६६ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३५७ व जिल्हा बाहेरील १२६ अशा एकूण ८ हजार ५७७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
(वरील आकडेवारी ही दि. ३१ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ वाजता नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)
ह्या बातम्यासुद्धा नक्की वाचा:
नाशिक: सणांपूर्वीच कडाडले डाळींचे दर; बेसनपीठही महागले
प्रत्येक शाळेत मराठी भाषा विषय आता सक्तीचा, उल्लंघन करणाऱ्या शाळेला मोठा दंड
WhatsApp मध्ये चॅट बॉक्स ओपन न करताच वाचता येतील Message, पाहा काय आहे ट्रिक