नाशिक: विनाहेल्मेट पेट्रोल न दिल्याने पंप कर्मचाऱ्याला मा’र’हा’ण करणाऱ्यांना अनोखी शिक्षा

नाशिक: विनाहेल्मेट पेट्रोल न दिल्याने पंप कर्मचाऱ्याला मा’र’हा’ण करणाऱ्यांना अनोखी शिक्षा

नाशिक (प्रतिनिधी): विनाहेल्मेट पेट्रोलसाठी पंपावरील कामगाराला मा’र’हा’ण करणाऱ्या संशयितांना याबद्दल म्हसरुळ पोलिसांनी अनोखी शिक्षा दिली आहे. दिंडोरीरोडवरील ज्या पंपावर हा’णा’मा’री केली तेथेच हातात ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ची जनजागृती करणारे फलक घेत वाहनचालकांना हेल्मेट वापरण्याचे आवाहन संशयित करत आहेत. या अनोख्या शिक्षेचे नागरिकांनी स्वागत केले असून याबाबत शहरात चर्चा सुरू आहे.

‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ या उपक्रमास १५ ऑगस्टला प्रारंभ झाला. प्रारंभीचे दोन दिवस या मोहिमेला संमिश्र प्रतिसाद मिळाला. तिसऱ्या दिवशी दिंडोरीरोडवरील एका पंपावर विनाहेल्मेट आलेल्या तिघांना पेट्रोल देण्यास नकार मिळाल्याने त्यांनी पंप कामगार ज्ञानेश्वर गायकवाड यांना बे’द’म मा’र’हा’ण केली. द’ग’ड मारून ज’ख’मी केले. म्हसरुळ पोलिसांनी संशयितांना सीसीटीव्हीच्या आधारे माग काढत अटक केली होती.

या घटनेची पोलिस आयुक्तांनी गंभीर दखल घेत शहरातील सर्वच पंपांवर भेट देत कामगारांना पोलिस तुमच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही देत त्यांचे मनोबल उंचावले होते. यामुळे शहरातील सर्वच पंपांवर विनाहेल्मेट पेट्रोल देणे बंद झाले.

यामुळे हेल्मेट वापर वाढल्याचे निदर्शनास आले. या उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी आयुक्तांनी सूचना दिल्या आहेत. म्हसरुळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक साखरे यांनी संशयितांना बोलावून घेत ज्या ठिकाणी पंप कामगाराशी वाद घातला त्याच ठिकाणी हातात फलक देत ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ची जनजागृती करण्याची अनोखी शिक्षा दिली. या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले. तसेच पोलिसांच्या या अनोख्या शिक्षेला दाद देत म्हसरुळ पोलिसांचे आभार व्यक्त केले.
ह्या बातम्यासुद्धा नक्की वाचा:
नाशिक: इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून दीड वर्षाच्या बाळाचा मृत्यू
नाशिक: नळ कनेक्शन लावण्यावरून झालं भांडण; शेजाऱ्याने दगडच डोक्यात मारला..
नाशिक शहरातील या भागात शुक्रवारी (दि. ३ सप्टेंबर) पाणीपुरवठा नाही

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News