नाशिक: सणांपूर्वीच कडाडले डाळींचे दर; बेसनपीठही महागले

नाशिक: सणांपूर्वीच कडाडले डाळींचे दर; बेसनपीठही महागले

नाशिक (प्रतिनिधी): बाजारात विविध डाळी, बेसनपीठ महागले आहे. हे दर अजून वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे. दहा दिवसांपूर्वीच किरकोळ बाजारात ६७ ते ७० रुपये किलोने विक्री होणारी चणाडाळ आज थेट ७० ते ७६ रुपयांवर जाऊन पोहोचली आहे.

तर बेसनपीठाचे दर ९० रुपये किलोवरून ९५ रुपयांवर पोहोचले आहेत. मूगडाळ, उडीदडाळ आणि तुरडाळीचेही दर अशाचप्रकारे भडकले आहेत.

देशभरात यावर्षी पावसाने काही भागात हाहाकार उडवून टाकल्याचे तर काही ठिकाणी प्रचंड ओढ दिल्याने डाळी, तेलबिया, तांदूळ यांचे उत्पन्न यावर्षी कमी होण्याची चिन्हे आहेत. जेथे पीक चांगले आहे, तेथे शेवटच्या टप्प्यात जर पाऊस पडला तर हाती आलेले पीक गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते की काय? अशी भीती व्यक्त होत आहे.

याचे पडसाद मात्र बाजारात दिसू लागले आहेत. सर्वप्रकारच्या डाळी महागण्यास सुरुवात झाली असून बेसनपीठही महागले आहे. पेट्रोल, खाद्यतेल, सुकामेवा, मिठाई आणि आता पुन्हा डाळींचे दर महागल्याने सणासुदीच्या काळात लोकांना करेदी करताना आधीच आखडता घ्यावा लागणारा हात अजून आखडता घ्यावा लागणार आहे.
ह्या बातम्यासुद्धा नक्की वाचा:
प्रत्येक शाळेत मराठी भाषा विषय आता सक्तीचा, उल्लंघन करणाऱ्या शाळेला मोठा दंड
WhatsApp मध्ये चॅट बॉक्स ओपन न करताच वाचता येतील Message, पाहा काय आहे ट्रिक

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News