मराठा क्रांती मोर्चातर्फे पुन्हा आंदोलन!

औरंगाबाद ; सरकारला 10 दिवस आधीच आंदोलनाचा इशारा दिला होता. तरी देखील सरकारने कोणतेही पाऊल उचललं नाही.असे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते यांचे म्हणणे आहे. म्हणून मराठा क्रांती मोर्चातर्फे आता ‘आत्मबलिदान’  आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. कायगाव टोका येथे उद्या (23 जुलै) आंदोलन करण्यावर मराठा कार्यकर्ते ठाम असल्याची माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी दिली आहे.

मराठा क्रांती मोर्चा आंदोलनात आपले जीव गमावलेले मराठा समाजाच्या तरुणांच्या कुटुंबाला राज्य सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. त्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने कोणतीही मदत दिली नाही. त्यामुळे मृतांच्या कुटुंबाला अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सरकारला 10 दिवस आधीच आंदोलनाचा इशारा दिला होता. तरी देखील सरकारने कोणतेही पाऊल उचललं नाही. त्यामुळे आंदोलनावर ठाम असल्याचं रमेश केरे पाटील यांनी सांगितलं आहे.

काकासाहेब शिंदे या मराठा तरुणाने मराठा आरक्षणासाठी कायगाव टोका येथे जलसमाधी घेतली होती. त्याच ठिकाणी उद्या आंदोलन करणार करण्यात येणार आहे. दुसरीकडे, कायगाव टोका येथे होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद पोलिसांनी आतापासून फौजफाटा तैनात केला आहे. पोलिसांनी कोणतेही पाऊल उचलले तरी आंदोलनावर मराठा क्रांती ठोक मोर्चा ठाम असल्याचं रमेश केरे पाटील यांनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या 42 कुटुंबातील व्यक्ती देखील या आंदोलनात सामील होणार आहेत. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार असल्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्च्याच्या वतीने देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली ग्वाही

दरम्यान, मराठा आरक्षणाचा खटला सुप्रीम कोर्टात सुरू आहे. हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टात मान्य झाला तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल ही भीती ओबीसी समाजाला वाटते. ती त्यांनी मनातून काढून टाकावी, मी महाधिवक्त्यांशी चर्चा केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का बसणार नाही

याबाबत ओबीसी समाजाच्या शंका-कुशंका आणि भीती दूर करण्यासाठी महाधिवक्ता यांच्यासमवेत तुमची भेट घडवून आणू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये मंगळवारी केले.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News