कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज राज्य मंत्रिमंडळाची प्रदीर्घ बैठक पार पडली.
मुंबई (प्रतिनिधी): राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. पण, तरीही लोकांकडून नियम पायदळी तुडवले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यात आता पूर्णपणे लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे, याबद्दलचा निर्णय झाला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबद्दल घोषणा करणार आहेत, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.
कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज राज्य मंत्रिमंडळाची प्रदीर्घ बैठक पार पडली. कडक निर्बंध ऐवजी लॉकडाऊन करावा याबाबत अनेक मंत्र्यांनी आपली भूमिका मांडली. आज राज्यमंत्र्यांना सुद्धा कॅबिनेट बैठकीत बोलवण्यात आलं होतं.
लॉकडाऊन बाबत चर्चा झाली आहे. सर्व लशी देण्यासाठी परवानगी मिळावी आहे. यासाठी केंद्राकडे मागणी केली आहे. ऑक्सिजन, लस पुरवठा दिला जाणार आहे. काही तासात लॉकडाऊनचा निर्णय होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबद्दल लवकरच घोषणा करणार आहे, अशी माहिती अस्लम शेख यांनी दिली.