कांदा निर्यात बंदीचा वाद पेटला, ठाकरे सरकार पाठवणार केंद्राला पत्र

लासलगावात कांद्याच्या भावात क्विंटल मागे 1000 रुपयांची घसरण झाली आहे. भाव कोसळल्याचे पाहून शेतकरी संतप्त झाले आहे.

नाशिक (प्रतिनिधी): केंद्र सरकारने कांदा उत्पादनावर निर्यात बंदी घातल्यामुळे वाद पेटला आहे. महाविकास आघाडी सरकारने केंद्राच्या या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाविकास आघाडी सरकार या निर्णयावर फेरविचार करावा यासाठी केंद्राला पत्र लिहिणार आहे.

लॉकडाऊनमुळे 6 महिने शेतकऱ्यांनी नुकसान सोसलं आहे. शेतकऱ्याने मोठ्या मेहनतीने कांद्याचे उत्पादन घेतले आहे. पण सोमवारी दुपारी अचानक केंद्र सरकारने निर्यातबंदी जाहीर केली. हजारो टन कांदा आता बंदरांमध्ये अडकला आहे. केंद्राच्या या भूमिकेवर महाविकास आघाडीमधील नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मनमाडमध्ये शिवसेनेनं आंदोलनाचा इशारा दिला आहे. लासलगावला शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य शिवा सुरसे यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे  लासलगाव बाजार समितीत परिणाम दिसून आले आहे. कांद्याच्या भावात क्विंटल मागे  1000 रुपयांची घसरण झाली आहे. भाव कोसळल्याचे पाहून शेतकरी संतप्त झाले आहे. त्यामुळे कांद्याचा लिलाव बंद पाडले आहे.

बच्चू कडूंनी दिला आंदोलनाचा इशारा

तर कांदा उत्पादक शेतकरी सातत्याने अडचणीत आलेला आहे. आता कुठे कांद्याला भाव मिळायला लागले होते. यात अचानक केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंद करण्याचा आदेश काढलेला आहे. त्यामुळे निर्यातीसाठी निघालेले  कांद्याचे कंटेनर सध्या थांबवण्यात आले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडणार आहे. या प्रश्नावर आता बच्चू कडू आक्रमक झाले असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू केंद्र सरकारच्या वाणिज्य व कृषी मंत्रालयात छुप्या पद्धतीने आंदोलन करणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

दरम्यान, कांद्या प्रश्नी केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी बैठक बोलवली आहे. या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे खासदार राहणार उपस्थित डॉ. भारती पवार, डॉक्टर भामरे, डॉ. सुजय विखे पाटील आदी खासदार उपस्थित राहणार आहे. याच बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित राहणार आहे. संसद भवनातील पीयूष गोयल यांच्या कार्यालयात ही बैठक  होणार आहे.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News