creditcard

राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह फेसबुक लाइव्ह करणाऱ्या हसन कोटी वर गुन्हा दाखल

axis

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बांगलादेशी-पाकिस्तानी घुसखोरांविरुद्ध एल्गार पुकारला आहे. मनसेच्या या आक्रमक पावित्र्यानंतर मुंबई पोलीसांनीही असे घुसखोर शोधून त्यांच्यावर कारवाई करायला सुरुवात केली आहे. या कारवाईमुळे मालवणी येथे राहत असलेला हसन कोटी हा चवताळला. हसन कोटी याने फेसबुक लाईव्ह करून राज ठाकरे, मनसेचे कार्यकर्ते तसेच मुंबई पोलीस यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषा वापरली होती. हा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आणि त्यावर लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

No posts found.

या हसन कोटीने अतिशय अर्वाच्य भाषेत मनसे तसेच मुंबई पोलिसांना आव्हान दिले होते. याबाबत मनसेचे मालाड विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांनी मालवणी पोलीस ठाण्यात अर्ज दाखल केला आणि यात हसन कोटीने समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने त्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली होती.

त्यानंतर आज मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट टाकण्यात आली आहे. आणि या अर्जानंतर गुन्हा दाखल झाल्याचे म्हंटले आहे.