मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्लीत मोदींना भेटणार !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्लीत आहेत. सोनिया गांधी यांच्यासोबत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. अर्थात या भेटीमागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. परंतु ही औपचारिक भेट असून अंदाज वर्तवू नका, असं ट्वीट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की, ‘मी माझ्या मोठ्या भावाला भेटायला दिल्लीला जाणार आहे’. आता मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच दिल्लीमध्ये मोदींना भेटणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरे यांची मोदींसोबतची ही दुसरी भेट आहे. यापूर्वी ते पुण्यामधील कार्यक्रमासाठी आलेल्या मोदींना विमानतळावर भेटले होते.

Loading