माझ्या बापाने रक्त गाळून पक्ष उभारलाय, त्याला गालबोट लावाल तर गाठ सुप्रिया सुळेशी आहे

मराठवाड्याच्या दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी आजचा दिवस मोठा वादळी ठरला. सुप्रिया सुळे यांच्या पैठणमधील कार्यकर्ता मेळाव्यात स्थानिक नेत्यांमधील गटबाजी उफाळून आली आणि भर कार्यक्रमात अक्षरशः राडा झाला. त्यामुळे थेट सुप्रिया सुळे यांनाच माईक हातात घेऊन कार्यक्रम नियंत्रणात आणावा लागला .

supriya sule

कार्यक्रम नियंत्रणात आला खरा, मात्र ज्यांनी राडा केला त्यांना पक्ष धडा शिकवणार का? असा प्रश्न यानिमित्ताने आता उपस्थित होतो आहे.

सुप्रिया सुळे 2 दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर आल्या असता त्यांना पैठणमध्ये कार्यकर्त्यांच्या अंतर्गत गटबाजीचा सामना करावा लागला. पक्षातील अंतर्गत संघर्ष हा इतका टोकाचा होता की अखेर सुप्रिया सुळे यांना राडेबाज कार्यकर्त्यांना आपल्या बापाला या पक्षासाठी रक्त गाळावं लागल्याची आठवण करून द्यावी लागली. कार्यकर्त्यांच्या तुफान राड्यात सुप्रिया सुळे यांची अवस्था चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यू सारखी झाली होती. मात्र, सुप्रिया सुळे यांनी गटबाजीचं हे चक्रव्यूह भेदत राडा करणाऱ्या कार्यकर्त्यांना सार्वजनिकपणे सज्जड इशारा दिला.

शुक्रवारी (21 फेब्रुवारी) सकाळी सुप्रिया सुळे पैठण शहरात पोचल्या. सकाळी सकाळी कर्यकर्त्यांसमोर सुंदर भाषण करावं. 80 वर्षांच्या तरुणाने केलेल्या पराक्रमाची कहाणी सांगावी असं त्यांच्या डोक्यात होतं. मात्र, घडलं भलतंच. राष्ट्रवादीचे पैठण विधानसभा मतदारसंघाचे पराभूत उमेदवार दत्ता गोर्डे यांनी भाषण करताना त्यांचेच सहकारी संजय वाकचौरे यांच्यावर नाव न घेता टीका केली. त्यामुळे चवताळलेल्या वाकचौरे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत दत्ता गोर्डे यांचं भाषण बंद पाडलं .

सभागृहात सुरु झालेला राडा इतका टोकाचा होता की गोर्डे आणि वाकचौरे यांचे समर्थक आपापल्या नेत्यांनी विनंती करुनही ऐकायला तयार नव्हते. सरते शेवटी सुप्रिया सुळे यांनाच आक्रमक होऊन माईक हातात घ्यावा लागला. पण तरीही ऐकतील ते पैठणकर कसले. शेवटी सुप्रिया सुळे यांना दत्ता गोर्डे आणि संजय वाकचौरे यांनाच मंचावरून उतरवून थेट सभागृहाच्या बाहेर काढावं लागलं. त्यानंतर कार्यकर्त्यांनी नमतं घेत सभागृहात थंडपणा घेतला.

Loading

Leave your vote

Log In

Forgot password?

Forgot password?

Enter your account data and we will send you a link to reset your password.

Your password reset link appears to be invalid or expired.

Log in

Privacy Policy

Add to Collection

No Collections

Here you'll find all collections you've created before.