मुंबईत कोरोनाव्हायरसचे 80 संशयित रुग्ण

राज्यात कोरोनाव्हायरसचे (Coronavirus) सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहेत, तर मुंबईत कोरोनाव्हायरसचे तब्बल 80 संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh tope) यांनी दिली. त्यामुळे मुंबईकरांनो आरोग्याची काळजी घ्या, कोणत्याही सर्वसामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. मुंबईत कोरोनाव्हायरसचे 5 रुग्ण आहेत आणि 80 संशयित रुग्ण आहेत. या रुग्णांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाव्हायरस रुग्णांवर सुरू असेलल्या उपचारांचा आणि सोयीसुविधांचा आढावा घेतला.

या रुग्णांना जेवण, टीव्ही, वायफाय सुविधा देण्याचा प्रयत्न करत असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. कस्तुरबा रुग्णालयातील लॅबची क्षमता वाढवणार, अहवाल जलद गतीनं मिळावा यासाठी नव्या मशीन्स बसवल्या जाणार आहे. केईएम रुग्णालयातही अशा मशीन्स बसवणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. शिवाय पुण्याव्यतिरिक्त सोलापूर, धुळे, औरंगाबाद आणि मिरज या चार ठिकाणी महिनाभरात  लॅब उभारणार असंही राजेश टोपे म्हणाले.

महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या 32 वर पोहोचली आहे. पुण्यात 10, पिंपरी-चिंचवड आणि मुंबईत प्रत्येकी 5, नागपुरात 4, यवतमाळमध्ये 2 तर ठाणे, अहमदनगर, कल्याण, पनवेल, नवी मुंबई आणि औरंगाबादमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आहे. रुग्णांची संख्या वाढली असली, तर रोगप्रतिकारक शक्तीने या व्हायरसवर मात करणं शक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, सरकार आणि डॉक्टरांच्या सूचना पाळाव्यात, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेशष टोपे यांनी नागरिकांना केलं आहे.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News