creditcard

पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ घोषणेनंतर ऊर्जा मंत्रालय हादरलं, देशाचा वीज पुरवठाच होऊ शकतो ठप्प

axis

नवी दिल्ली 03 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या रविवारी रात्री 9 वाजता 9 मिनिटे आपल्या दारासमोर किंवा गॅलरीत दिवा लावण्याचं आवाहन देशवासियांना केलं होतं. एका व्हिडीओ संदेशातून मोदींनी देशवासियांना हे आवाहन केलं. या आधीही पंतप्रधानांनी कोरोनाविरुद्ध लढणाऱ्यांसाठी कृतज्ञता म्हणून टाळ्या आणि थाळ्या वाजविण्याचं आवाहन केलं होतं. त्याला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. आताही तसाच प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पण या घोषणेनंतर देशाचं ऊर्जा मंत्रालय हादरून गेलं आहे. कारण देशवासियांनी एकाच वेळी लाईट्स बंद केलेत तर मागणीत एकदम घट होऊन नवेच संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

No posts found.

कोरोनामुळे सगळ्यांच्या मानत जो अंधार निर्माण झालाय तो दूर करण्यासाठी दिव्यांचा प्रकाश प्रेरणा देईल असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

वीज ही साठवून ठेवता येत नाही. मागणी आणि पुरवठ्याप्रमाणे त्याचं काम सुरू असते. पण अचानक वीजेची मागणी एकदम कमी झाली तर देशभरातल्या वीज पुरवठ्या त्याचा विपरीत परिणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असं झालं तर देशभरातला वीज पुरवठा ठप्प होऊ शकतो अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याबाबतचं वृत्त ‘इकॉनॉमिक्स टाईम्स’ने दिलं आहे.

देशातल्या वीज पुरवढ्याच्या संदर्भात Central Electricity Regulatory Authority (CERC) ने काही नियम घालून दिले आहेत. त्यानुसार त्याचा पुरवठा सुरू असतो. मात्र अचानकच मागणीत घट झाल्यासं सर्व यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात ऊर्जा मंत्रालयात आज महत्त्वाची बैठकही पार पडली.