मुंबईत आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची हुशारी; डिलिव्हरी बॉयच्या वेशात अशा आवळल्या मुसक्या

मुंबई (प्रतिनिधी): एका सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलिसांनी मोठी शक्कल लढवली आहे. चक्क झोमॅटोचे डिलिव्हरी बॉयचा वेशात या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. मात्र, झटापटीत पोलीस जखमी झाले आहे. या कारवाईत आरोपीकडून 10 लाखांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांच्या धाडसाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

पाठलाग करत आरोपीला अटक:
वाँटेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी क्राइम ब्रँच युनिटचे वरिष्ठ दीपक सावंत यांनी झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा वेश केला होता. आरोपीला पकडताना ते गंभीर जखमी झाले आहेत, पोलिसांनी आरोपीकडून 10 लाख रुपयांचा एमडीही जप्त केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ते एका वाँटेड आरोपीच्या शोधात आंबोली परिसरात पोहोचले होते. तेथे उपस्थित फैजल माखनोजा पाहून त्यांना त्याच्यावर संशय आला, त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याची चौकशी सुरू केली असता तो पोलिसांपासून पळू लागला.

पैशाच्या वादातून हत्या केल्याचा आरोप:
मालवणी साई दर्शन सोसायटी चाळ क्रमांक 6 मधील खोली क्रमांक 2 मधील रहिवासी घरात बेशुद्ध अवस्थेत पडून असल्याचा फोन मालवणी पोलीस ठाण्याला आला. मालवणी पोलिसांना माहिती मिळताच मालवणी पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्या बेशुद्ध व्यक्तीला तात्काळ उपचारासाठी नेण्यात आले. शताब्दी रूग्णालयात डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार डोक्याला मार लागल्याने जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. जॉय जॉन पॉल (वय 43, वर्ष) असे मृताचे नाव आहे. पोलीस तपासात मृताचा भाऊ विन्सी गेलिब्रेट रॉड्रिग्ज हा त्याच गल्लीतील रुम नंबर 9 मध्ये राहतो असे समोर आले. 29 डिसेंबर रोजी रात्री 3 वाजता दोन्ही भावांनी एकत्र दारू प्यायली. त्यावरून दोघांमध्ये भांडण झाले. पैशांवरून आरोपीने त्याला जमिनीवर ढकलून बेदम मारहाण केली. घटनेनंतर आरोपी तिथून निघून गेला. पोलिसांनी मोठ्या भावाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News