BREAKING: महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

एकीकडे कोरोनाच्या संशयित रुग्णांचा आकडा वाढत असतानाच मुंबईहून धक्कादायक बातमी समोर येते आहे. कोरोनाने पिडीत एका वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कर्नाटक आणि दिल्लीनंतर मुंबईत हा तिसरा बळी गेला आहे. आतापर्यंत मृत्यू झालेले तिन्ही जण हे वयोवृद्ध होते आणि प्रत्येकाला “मेडिकल हिस्ट्री” होती. वयोमानामुळे मुळातच रोगप्रतिकार शक्ती ही कमी झालेली असते त्यामुळे ह्या वयोगटातील लोकांना कोरोनाचा संसर्ग लवकर होण्याची शक्यता असते. त्यामुळे लोकांनी घाबरून न जाता स्वतःहून काळजीची पावलं उचलणे गरजेचे आहे. अगदीच आवश्यक असेल तरच बस किंवा रेल्वेने प्रवास करावा आणि शक्यतो गर्दीची ठिकाणं टाळावी.